Saturday, 18 February 2017

वेल्हा: राजकारणाची रणधुमाळी

राजकारणाची रणधुमाळी...
             संपूर्ण महाराष्ट्रात असो, किंवा  जिल्हा परिषदा असोत, चहू बाजूने निवडणुकांचा  धुराळा उडत असताना राज्याच्या राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी हि निवडणूक  ठरत असताना वेल्हा तालुका असो किंवा पुणे जिल्हा असो. तालुक्याच्या राजकारणाचा जिल्ह्याच्या राजकारणावर आणि जिल्ह्याच्या राजकारणाचा राज्यच्या राजकारणावर परिणाम होणार नक्की. त्यामुळे तालुक्याच्याराजकारणावर प्रकाश टाकणे किंवा उहापोह  क्रमप्राप्त आहे.
राज्यशासनाने जिल्हा परिषदेमार्फत ग्रामविकासाठी विविध योजनांच्या नावांचा पाऊस पडलेला दिसतो. वेल्ह्यात मात्र काँग्रेसचं सरकार आहे अशी खात्री पट्टे ती सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बघितल्यानंतर . रस्त्याने पुण्यावरून वेल्ह्याला गेलात आणि नसरापूर क्रॉस करून वेळाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली कि तुमच्या आपोआप लक्षात येईल कि इथे एवढे खड्डे आहेत म्हणजे नक्की इथे काँग्रेसचच सरकार आहे.
लहरी राजा आणि प्रजा आंधळी. घरोघरी मोदिबाबाने, जिल्हा परिषदेने शौचालये दिली आहेत पण पाणिच नाही तर शौचालये वापरणार कोण?  शेजारच्या भोर सारख्या तालुक्यात उत्तम नसले तरी बरे रस्ते आहेत मात्र वेल्ह्यात का नाहीत? वेल्ह्यातील रस्त्यांचं वर्णन करायचं झालं तर सेराट मधील लंगड्याची फाटलेली चड्डीच जणू.
     मागील १० वर्षात शेजारच्या भोरसारख्या तालुक्यात ५-१० व्यावसायिक शिक्षणाची महाविद्यालये सुरु झाली. वेल्ह्यात मात्र एक सुद्धा होऊ शकलं नाही. आरोग्याचा प्रश्न आहेच. साधा-सुधा आजार जरी असेल तर पुण्याला जावं लागत हे यशापयश कुणाचं? खरं तर तालुक्याला म्हणावा असा सर्वमान्य पुढारी होऊ शकला नाही. पुणे शहराचा विकास वेल्हे तालुक्यातील धरणांमुळे झाला. पुण्याचं पेरीस झालं पण वेल्ह्याचं मात्र                     वाटोळं झालं. धारणामुळे विस्थापित झालेल्या लोकांच आयुष्य कुणी बेचिराख केलं? आज वेळ तालुक्याचं दरडोई उत्पन्न ६रु. ४०.पैसे आहे. पुणे शहरात एक माणूस १६ रु एका दिवसाला कमवितो तेव्हा तोच माणूस वेळा तालुक्यात १ रुपया कमवतो. ह्या ४०-४५ किमी अंतरावरील असणाऱ्या आर्थिक  आणि विकासाबाबतच्या तफावतीला कोण जबाबदार आहेत? वेल्हा  तालुक्यात मूलभूत, पायाभूत सुविधाच नाहीत  तर मग बाकीच्या गोष्टी न बोललेल्याच  बऱ्या.
               वेल्हा तालुका पूर्वीपासूनच काँग्रेस आय चा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्याला वेगवेगळी करणे आहेत. पहिलं  कारण म्हणजे हाताचा पंजा एकमेव, सर्वश्रूत उमेदवार लोकांना माहीत असायचा, दुसरा  मुद्दा स्थानिक नेतृत्वाने, आमदाराने आपल्या ताटाखालील मांजर असलेल्याच  व्यक्तीला संधी दिल्या. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर, किंवा स्वतःला स्पर्धक निर्माण होणार नाही याची पुरेपूर काळजी तालुका पातळीवरील काँग्रेस नेतृत्वाने घेतलेली दिसून येते.  आणि  आता  चिरंजीव यांनी तालुक्याचे नेत्रीत्व हाती घेतले आहे. सध्या आमदार असल्याने कॉग्रेस देशात जरी  असली तरी सध्यपरिस्थितीत वेळ तालुक्यात तरी काँग्रेसला  नाही हि वस्थुस्थिती आहे. असो तर मुद्दा हा  कि तालुक्याच्या राजकारणाच्या चाव्या कोणाकडे आहेत? तर आमदार म्हणून त्या काँग्रेसकडे आहेत असं म्हणावं लागेल. तालुक्यात महत्वाच्या ठिकाणी काँग्रेस आहे हे नाकारून चालणार नाही. संपूर्ण देशात मोदी लाट, मोदी फँक्टर असताना सुद्धा ज्या ठिकाणी चालला नाही इतका मजबूत बालेकिल्ला काँग्रेसने किंबहुना स्थानिक नेतृत्वाने निर्माण केलाय. तर विषय होता पक्षीय राजकारणाचा. काँग्रेस नेतृत्वाने पदे आणि आवश्यक निधी देऊन समर्थक निर्माण केले आहेत. मात्र अशा समर्थकांतूनच कोणीतरी भविष्यातील स्पर्धक निर्माण  होऊ नये अशी काळजीसुद्धा काँग्रेस नेतृत्वाने घेतली आहे. वेल्हा तालुक्यात प्रत्येक गावात काँग्रेसचा कार्यकर्ता आहे हेही मेनी करावे लागेल. कारण अडीअडचणीला आमदार, लोकप्रतिनिधी ओळख  मदत करू शकते हि आशा , अशातूनच त्या त्या समर्थकाने त्या त्या लोकप्रतिनिधीने स्वतःचा योग्य पद्धतीने विकास करून घेतलेला आपणाला दिसतो.
   वेल्हा तालुक्यात दुसरा "दादा" पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. काँग्रेस नंतर दुसऱ्या ताकदीचा पक्ष किंवा बऱ्यापैकी लोकप्रतिनिधी असलेला पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे पाहता येईल. नाही म्हणायला लोकसभा मतदार संघातसुद्धा मोदी लाट चालली नाही आणि राष्ट्रवादीचा खासदार निवडून आला त्यामुळे राष्ट्रवादी किती दादा पक्ष आहे हे तालुका पातळीवर दुर्लक्षून चालणार नाही. जिल्हा परिषद सध्या राष्ट्रवादीकडे असाली तरी वेल्ह्यात २ जीप सदस्य काँग्रेसचे आहेत हि एक विशेष  बाब लक्षात घेण्यासारखी आहे. ह्यावेळी आर्थिक दादा असलेले इच्छुकांना संधी देऊन खरा दादा बनणार का ? ते हि पहावं लागेल. काँग्रेसची पडझड होते का राष्ट्रवादी मुसंडी मारते हे २३ तारीख ला कळेलच. पण राष्ट्रवादीच्या दादा प्रतिनिधींनी विकासाबाबतीत दादा कामगिरी केली नाही एवढं मात्र निश्चित.
    २०१२ ला मागच्या वेळी तालुक्यात जाईंट किलर, डार्क हॉर्स राहिलेली मनसे ह्यावेळी मात्र चाचपडत आहे. राज्य पातळीवर जेवढी मनसे खचली तेवढीच ती वेल्ह्यात खचलेली दिसतेय. पंचायत असणाऱ्या दोन सदस्यांपैकी एक सोडन गेला तर एकाच सदस्यत्व रद्द झालं त्यामुळे ह्या दोन झटक्यातून मनसे सावरलेली दिसत नाही.. भविष्यात किंवा येणाऱ्या निवडणुकीत फार काही मुसंडी मारेल अशी अपेक्षा नाही. मोठ्या विश्वासाने लोकांनी मनसेचे दोन प्रतिनिधी पंचायत समितीला पाठवले. त्याचा पक्षाला किंवा जनतेला काय फायदा झाला? माहिती नाही.
            अवगत माहितीप्रमाणे आजपर्यंत विशेष लोकप्रतिनिधी जीप किंवा पंचायत समितीवर न पाठवू शकलेला पक्ष म्हणजे शिवसेना. १९७७ पासून वेल्हे तालुक्यात शिवसेनेच रोपटं लावलं ते माजी मंत्री, बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू, निष्ठावंत सहकारी के. शाबीरभाई शेख यांनी. निष्ठावंतांची ओळख मिळवणारी शिवसेना आजपर्यंत जिल्हा किंवा तालुका पातळीवर भगवा फडकवू शकले नाहीत याच कारण सर्वच पक्षांप्रमाणे विखुरलेले पदाधिकारी, नसलेली एकवाक्यता. पक्षांपेक्षा स्वतःला मोठं करायची आकांक्षा, स्वतःसाठी पक्ष वापरायची सवय ह्यामुळे कार्यकर्त्यांची फोज निवडणुकीत  यश परावर्तित शकली नाही. चालू निवडणुकीत शिवसेना काय करिश्मा करते तेही पाहावे लागेल. सर्वच पक्षांना संधी आहेत पण त्याचा कोण लाभ उठवतो ते सर्व पक्षांवर अवलनबुन आहे. मनसेचा एक प्रतिनिधी शिवसेनेत दाखल झाल्यामुळे सेनेची टाकत निश्चितच वाढली आहे.
देशाच्या व राज्याच्या सत्ताधारी असलेल्या भाजप ला वेल्ह्यात अत्यंत नगण्य संधी आहे असं चित्र आहे. मात्र राष्ट्रवादीचे पूर्वाश्रमीचे बरेच कार्यकर्ते मित्रपक्ष भाजपत डेरेदाखल झालेत, त्यामुळे बोटांवर मोजता येतील  अशा कार्यकर्त्यांची भाजप वेल्हा तालुक्यात काय कोशल्य करते तेही पहावं लागेल. मोदींच्या नावाने हि निवडणूक जिंकणं भाजपला अवघड आहे.
        सर्वच  प्रमुख राजकीय पक्षांनी आपापले वारू चोखूर सोडले असले तरीही वेल्ह्यातील सुजाण जनता स्वताच्या धडावरील  स्वताचंच डोकं वापरून कोणाला पंसंती  देते हे २३ तारखेला कळेलच. तूर्तास सर्व राजकीय पक्षांना सर्व उमेदवारांना सर्वकाळी सर्व शुभेच्छा!

Friday, 9 September 2016

मोहिम गुंजवणी दरवाजा

मोहिम गुंजवनी दरवाजा...

राजगड...गडकोटांच्या मांदियाळीतिल मानाच् सुवर्णपान, अन् त्याच् राजगडावर मी किमान ३५ वेळा गेलो असेन, पण १४ ऑगस्ट २०१६ ला राजगडाने अंतरात्म्याला साद घातली आणि सुरु झाला प्रवास मोहिम गुंजवनी दरवाजा...मी, मनोज, मोहन...आपण जाऊ मॅन वर्सेस वाइल्ड टाईप, बियर ग्रिल्स टाईप जंगल सफारी करायला, या हेतुने आम्ही एक डॉबर आणि एक गावठी कुत्रे घेतले आणि एक त्रिशूळ भाला पण घेतला सोबतीला...सुरुवात अतिशय भन्नाट, जोमात, जोशात केली. पाणी दिसले की काढ़ फोटो, दे पोज आणि काढ़ फोटो. आताशी मजल दरमजल करत करत राजगडाच्या अंगावरुण नदिचा मुख्य प्रवाह सुरु होतो तिथ पर्यंत आलो. कपड़े काढली आणि पाण्यात उड्या मारल्या फोटो काढले. ठंड श्वासांचा ब्लास्ट झाला, पार अगदी शुरिंगा झाला. रिफ्रेश झालो वाट्ल आणखी वर जाऊ. मोहन म्हटला मला गुंजवने दरवाजाची नवी वाट माहिती आहे, चला आपण जाऊ तिथ पर्यंत जाऊ नाही तर परत येऊ. झाल् ठरल्,आम्ही गुंजवने दरवाजाचा जंगलातील रस्ता शोधु लागलो. रस्ता सापडला आणि खरी परीक्षा सुरु झाली २ किलो मीटरची तीव्र चढ़ाई सुरु झाली. मन्याने गगनभेदी शिवगर्जना केली...छत्रपती शिवाजी महाराज की...जय...संपूर्ण रान आवाजाने तरारल, शहारल आणि झाडांनिही अनुभवला पुन्हा एकदा साड़ेतीनशे वर्षा नंतरचा जयघोष...पुन्हा आम्ही आवाज दिला...हर हर महादेव...हर हर महादेव...हर हर महादेव...
कधीही गुंजवने दरवाजाने चढ़लो नव्हतो त्यामुळे आम्ही हिमालय चढ़तोय का काय असा भासपण बऱ्याचदा झाला. पुण्यात आल्याने किंबहुना बाईकमुळे चालण् कमी झाली आणि आपण २० किलोमीटर रोज चालू शकत होतो ती गोष्ट आता इतिहासजमा झाली आहे आणि आता आपल्याला एक एक पाऊल वर चढ़ायला श्वास थांबुन हृदय फूटतय का काय असा अनुभव यायला सुरुवात झाली. मोहन आणि मन्या जपाझपा पुढे चालत होते, मी त्यांच्या मागुन आवाज द्यायला, आरे थांबा तुम्हाला बिस्किटे घ्या, गोळ्या घ्या, बुबालु घ्या अमुक घ्या तमुक घ्या. माझा प्रयत्न त्यानी ओळखला आणि ते म्हणाले सुद्धा आरे हा फोफस्तोय, हा दमलाय. पण मी कुठला हो म्हणतोय, मी म्हटल आरे मी रोज जिमला जातो, तुमच्या सारखा नाही काही, तुम्ही चला पुढ़े. अंदाजे १ किमी तीव्र चढ़ाई केल्यानंतर पावसामुळे चपला चीकट झाल्या आणि पाय घसरु लागले, मोहन आणि मन्या आता माझ्या दमात आले. मनोज म्हटला अरे चला परत जाऊ. खुप अंधार होईल परत यायला, आता पाऊस पण जोरात यायला लागलाय, कुत्र थकतय तुझ. मी म्हटल, तु चाल पुढ़ कुत्र आणि मी येतो हळूहळू. मनोज पाच दहा मिनिटाने जाग्यावर उभा राहिला, तो पुन्हा कमरेवर दोन्ही हात ठेवून, विटेवरील विठ्ठलासारखाच. आता मी चालू शकत नाही, तुम्हाला जायचय तर तुम्ही जा, मी नाही येत, मनोज बोलला. २सेकंद मी विचार केला आणि बोललो आरे तु तर बोलतो मला मिल्ट्रीमन व्हायचय, पोलिस भरती करायचिये, मग अशीच करणार का? माझ्या या उपरोधिक प्रश्नाने मन्याचा स्वाभिमान दुखावला, जागा झाला आणि मनु पेटून उठला तरातरा चालू लागला. मी चढ़ाई ची सूत्रे हातात घेतली. आता पर्यंत सर्वात मागे असलेला मी आता तिघांच्या तुकडिचं नेतृत्व करत होतो. आम्ही सर्व त्राण आणून चढ़ाई चालूच ठेवली. मी दोघांना धीर द्यायला, आरे चला लवकर थोडेच अंतर बाकी राहिलय, आपण पोहोचतोयच ५ मिनिटांत. आता पर्यंत रुंद असलेली पायवाट आता फक्त एक फुटाची चिंचोळी झाली. श्वास आता दुप्पट झाला होता. वनविभागाने लावलेले लोखंडी खांब आम्हाला हिमालयातिल शेर्पासारखे मदतीस धावून येत होते. अत्यंत अवघड अशा दोन तीन ठिकाणी केवळ त्या खांबांमुळेच आम्ही वर जाऊ शकलो, जर ते खांब आडवे नसते तर आम्ही वर जाऊ शकलो नसतो ह्यात काही दुमत नाही. चढ़ता चढ़ता अचानक भलामोठा दगड वाटेत उभा आला आणि दुर्दैव म्हणजे त्यावर गरज असूनही लोखंडी बार किंवा खांबांची व्यवस्था नाहीय. त्यामुळे धोका पत्करुण मी शर्थीचे प्रयत्न करुण शिताफिने वाट काढली. आणि मन्याला धिर देवून वर घेतला, माझ्याकडे आमचा डॉबर कुत्रापण होता आणि तो दुष्काळात तेराव्या महिन्या सारखा जिकडे दरी होती तिकडेच मला खेचत होता, आणि माझ्या काळजाचा ठोका चुकत होता. अतिशय धोक्याच्या ठिकाणी आम्ही पहोचलो. आता वर जायच् का इथून परत खाली जायच् अशी द्विधा मनस्थिती झाली असताना मी मन्याला आणि मोहन ला धीर दिला आणि बोललो आरे इथपर्यंत आलोय तर वरती जाऊच आणि इथपर्यंत पुन्हा अस् येता येणार नाही त्यामुळे आलोय तर गुंजवनी दरवाजा सर करुच. थोड़ा धीर दिल्याने जरा स्फूर्ती आली आणि ते चल बोलले. मग आमच्याकडचा भाला, कैरीबैग सर्व काही एका ठिकाणी ठेवले. पूर्ण दगडी चढ़न असल्याने पायतान काढ़ायला भाग पडले. आता पायात चप्पल नसताना कातळ दगड आणखीन टोचत होता. तरीही आम्ही एक एक पाऊल वर चढ़त गेलो...पायवाटेवरुनच पाणी वाहात होते त्यामुळे वाट भक्कम आहे का नाही याची शाश्वती नव्हती. वर चढ़ताना अंगावर पाणी पडत होत एका हाताने कुत्रे पकड़ल् होते आणि दुसरा हात खाली टेकत टेकत वर सरकत होतो...एक तीव्र यूटर्न घेतला आणि सरळ वरती गेलो आणि समोर दिसला गुंजवने दरवाजा आणि त्याची अभेद्य कमान...तिथ सगळ्यात अगोदर मी पहोचलो आणि तोंडातून आवाज आला...जय भवानी! जय शिवाजी!...हर हर महादेव... तो होता आनंद विजयाचा...आनंद तो ज्या पाठीमागे थरार होता...तो आनंद शब्दात मांडण केवळ अशक्य आणि अशक्य आहे...
पण या आनंदानंतर पुन्हा नवीन आव्हान समोर उभे ठाकले होते. गुंजवने दरवाज्यामधुन प्रवेश करतो तिथेच पाण्याचा जणू तलाव साचला होता, कदाचित ते तत्कालीन शिवकालीन नियोजन असाव् की जर का शत्रू चालून आलाच तर तो बुचकळ्यात पडावा. आम्ही पण शिवरायांचे वारसदार समजतो त्यामुळे बुचकळ्यात पडन्याऐवजी मी त्यात पाय टाकत शिरलो, पण पाय घसरु लागले, चिखल असल्याने पाय गाडू लागले. थोड़ा विचार केला आणि एक झाडाची छोटी फांदी तोडली आणि पाण्याची खोली चेक केली. साधारण कमरेभर पाणी असल्याचा अंदाज घेतला, वजन कमी आणि चिखलात गादन्याची शक्यता कमी असल्याने मोहन च्या हातात ती फांदी दिली आणि दुसरी बाजू मी पकडून त्याला अगोदर दरवाजा पार करायला सांगितला. त्याने दरवाजा पार केल्या नंतर मी आणि मनोज ने दरवाजा आणि पाणी पार केले. डॉबर कुत्रा आणि दूसरा कुत्रा पोहुन पार आले. मग मात्र सुटकेचा श्वास सोडला. आता पुन्हा अंगात वेगळीच ऊर्जा, चेतना जाणवत होती. पाय झपाझप पद्मावत माची कडे पळत होते. बाकी पर्यटक आम्हाला विचारत होते, तुम्ही इकडून मधुनच कसे काय वर आलात? ते आम्हाला पण कळत नव्हतं कसे काय वर आलोत ते...आलोय पण नेमके कसे शब्द फूटत नव्हते आणि भावना ओसंडून वाहात होत्या. पुन्हा जयघोष झाला, जय भवानी!जय शिवाजी!, हर हर महादेव!...ह्या वेळी आमच्या आवाजात बाकी शिवप्रेमी पर्यटकांनी देखील आवाज मिळवला आणि तो आवाज राजगडावरील सुसाट घोंगावनाऱ्या, सुईसुई करनाऱ्या वाऱ्यापेक्षा आणि पावसापेक्षा मोठा होता...तो आवाज होता मराठ्यांचा, मावळ्यांचा...
कारण म्हणतात ना सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात तीनच गोष्टी मुक्तसंचार करु शकतात. वाघ, वारा आणि मावळे.