Friday, 9 September 2016

मोहिम गुंजवणी दरवाजा

मोहिम गुंजवनी दरवाजा...

राजगड...गडकोटांच्या मांदियाळीतिल मानाच् सुवर्णपान, अन् त्याच् राजगडावर मी किमान ३५ वेळा गेलो असेन, पण १४ ऑगस्ट २०१६ ला राजगडाने अंतरात्म्याला साद घातली आणि सुरु झाला प्रवास मोहिम गुंजवनी दरवाजा...मी, मनोज, मोहन...आपण जाऊ मॅन वर्सेस वाइल्ड टाईप, बियर ग्रिल्स टाईप जंगल सफारी करायला, या हेतुने आम्ही एक डॉबर आणि एक गावठी कुत्रे घेतले आणि एक त्रिशूळ भाला पण घेतला सोबतीला...सुरुवात अतिशय भन्नाट, जोमात, जोशात केली. पाणी दिसले की काढ़ फोटो, दे पोज आणि काढ़ फोटो. आताशी मजल दरमजल करत करत राजगडाच्या अंगावरुण नदिचा मुख्य प्रवाह सुरु होतो तिथ पर्यंत आलो. कपड़े काढली आणि पाण्यात उड्या मारल्या फोटो काढले. ठंड श्वासांचा ब्लास्ट झाला, पार अगदी शुरिंगा झाला. रिफ्रेश झालो वाट्ल आणखी वर जाऊ. मोहन म्हटला मला गुंजवने दरवाजाची नवी वाट माहिती आहे, चला आपण जाऊ तिथ पर्यंत जाऊ नाही तर परत येऊ. झाल् ठरल्,आम्ही गुंजवने दरवाजाचा जंगलातील रस्ता शोधु लागलो. रस्ता सापडला आणि खरी परीक्षा सुरु झाली २ किलो मीटरची तीव्र चढ़ाई सुरु झाली. मन्याने गगनभेदी शिवगर्जना केली...छत्रपती शिवाजी महाराज की...जय...संपूर्ण रान आवाजाने तरारल, शहारल आणि झाडांनिही अनुभवला पुन्हा एकदा साड़ेतीनशे वर्षा नंतरचा जयघोष...पुन्हा आम्ही आवाज दिला...हर हर महादेव...हर हर महादेव...हर हर महादेव...
कधीही गुंजवने दरवाजाने चढ़लो नव्हतो त्यामुळे आम्ही हिमालय चढ़तोय का काय असा भासपण बऱ्याचदा झाला. पुण्यात आल्याने किंबहुना बाईकमुळे चालण् कमी झाली आणि आपण २० किलोमीटर रोज चालू शकत होतो ती गोष्ट आता इतिहासजमा झाली आहे आणि आता आपल्याला एक एक पाऊल वर चढ़ायला श्वास थांबुन हृदय फूटतय का काय असा अनुभव यायला सुरुवात झाली. मोहन आणि मन्या जपाझपा पुढे चालत होते, मी त्यांच्या मागुन आवाज द्यायला, आरे थांबा तुम्हाला बिस्किटे घ्या, गोळ्या घ्या, बुबालु घ्या अमुक घ्या तमुक घ्या. माझा प्रयत्न त्यानी ओळखला आणि ते म्हणाले सुद्धा आरे हा फोफस्तोय, हा दमलाय. पण मी कुठला हो म्हणतोय, मी म्हटल आरे मी रोज जिमला जातो, तुमच्या सारखा नाही काही, तुम्ही चला पुढ़े. अंदाजे १ किमी तीव्र चढ़ाई केल्यानंतर पावसामुळे चपला चीकट झाल्या आणि पाय घसरु लागले, मोहन आणि मन्या आता माझ्या दमात आले. मनोज म्हटला अरे चला परत जाऊ. खुप अंधार होईल परत यायला, आता पाऊस पण जोरात यायला लागलाय, कुत्र थकतय तुझ. मी म्हटल, तु चाल पुढ़ कुत्र आणि मी येतो हळूहळू. मनोज पाच दहा मिनिटाने जाग्यावर उभा राहिला, तो पुन्हा कमरेवर दोन्ही हात ठेवून, विटेवरील विठ्ठलासारखाच. आता मी चालू शकत नाही, तुम्हाला जायचय तर तुम्ही जा, मी नाही येत, मनोज बोलला. २सेकंद मी विचार केला आणि बोललो आरे तु तर बोलतो मला मिल्ट्रीमन व्हायचय, पोलिस भरती करायचिये, मग अशीच करणार का? माझ्या या उपरोधिक प्रश्नाने मन्याचा स्वाभिमान दुखावला, जागा झाला आणि मनु पेटून उठला तरातरा चालू लागला. मी चढ़ाई ची सूत्रे हातात घेतली. आता पर्यंत सर्वात मागे असलेला मी आता तिघांच्या तुकडिचं नेतृत्व करत होतो. आम्ही सर्व त्राण आणून चढ़ाई चालूच ठेवली. मी दोघांना धीर द्यायला, आरे चला लवकर थोडेच अंतर बाकी राहिलय, आपण पोहोचतोयच ५ मिनिटांत. आता पर्यंत रुंद असलेली पायवाट आता फक्त एक फुटाची चिंचोळी झाली. श्वास आता दुप्पट झाला होता. वनविभागाने लावलेले लोखंडी खांब आम्हाला हिमालयातिल शेर्पासारखे मदतीस धावून येत होते. अत्यंत अवघड अशा दोन तीन ठिकाणी केवळ त्या खांबांमुळेच आम्ही वर जाऊ शकलो, जर ते खांब आडवे नसते तर आम्ही वर जाऊ शकलो नसतो ह्यात काही दुमत नाही. चढ़ता चढ़ता अचानक भलामोठा दगड वाटेत उभा आला आणि दुर्दैव म्हणजे त्यावर गरज असूनही लोखंडी बार किंवा खांबांची व्यवस्था नाहीय. त्यामुळे धोका पत्करुण मी शर्थीचे प्रयत्न करुण शिताफिने वाट काढली. आणि मन्याला धिर देवून वर घेतला, माझ्याकडे आमचा डॉबर कुत्रापण होता आणि तो दुष्काळात तेराव्या महिन्या सारखा जिकडे दरी होती तिकडेच मला खेचत होता, आणि माझ्या काळजाचा ठोका चुकत होता. अतिशय धोक्याच्या ठिकाणी आम्ही पहोचलो. आता वर जायच् का इथून परत खाली जायच् अशी द्विधा मनस्थिती झाली असताना मी मन्याला आणि मोहन ला धीर दिला आणि बोललो आरे इथपर्यंत आलोय तर वरती जाऊच आणि इथपर्यंत पुन्हा अस् येता येणार नाही त्यामुळे आलोय तर गुंजवनी दरवाजा सर करुच. थोड़ा धीर दिल्याने जरा स्फूर्ती आली आणि ते चल बोलले. मग आमच्याकडचा भाला, कैरीबैग सर्व काही एका ठिकाणी ठेवले. पूर्ण दगडी चढ़न असल्याने पायतान काढ़ायला भाग पडले. आता पायात चप्पल नसताना कातळ दगड आणखीन टोचत होता. तरीही आम्ही एक एक पाऊल वर चढ़त गेलो...पायवाटेवरुनच पाणी वाहात होते त्यामुळे वाट भक्कम आहे का नाही याची शाश्वती नव्हती. वर चढ़ताना अंगावर पाणी पडत होत एका हाताने कुत्रे पकड़ल् होते आणि दुसरा हात खाली टेकत टेकत वर सरकत होतो...एक तीव्र यूटर्न घेतला आणि सरळ वरती गेलो आणि समोर दिसला गुंजवने दरवाजा आणि त्याची अभेद्य कमान...तिथ सगळ्यात अगोदर मी पहोचलो आणि तोंडातून आवाज आला...जय भवानी! जय शिवाजी!...हर हर महादेव... तो होता आनंद विजयाचा...आनंद तो ज्या पाठीमागे थरार होता...तो आनंद शब्दात मांडण केवळ अशक्य आणि अशक्य आहे...
पण या आनंदानंतर पुन्हा नवीन आव्हान समोर उभे ठाकले होते. गुंजवने दरवाज्यामधुन प्रवेश करतो तिथेच पाण्याचा जणू तलाव साचला होता, कदाचित ते तत्कालीन शिवकालीन नियोजन असाव् की जर का शत्रू चालून आलाच तर तो बुचकळ्यात पडावा. आम्ही पण शिवरायांचे वारसदार समजतो त्यामुळे बुचकळ्यात पडन्याऐवजी मी त्यात पाय टाकत शिरलो, पण पाय घसरु लागले, चिखल असल्याने पाय गाडू लागले. थोड़ा विचार केला आणि एक झाडाची छोटी फांदी तोडली आणि पाण्याची खोली चेक केली. साधारण कमरेभर पाणी असल्याचा अंदाज घेतला, वजन कमी आणि चिखलात गादन्याची शक्यता कमी असल्याने मोहन च्या हातात ती फांदी दिली आणि दुसरी बाजू मी पकडून त्याला अगोदर दरवाजा पार करायला सांगितला. त्याने दरवाजा पार केल्या नंतर मी आणि मनोज ने दरवाजा आणि पाणी पार केले. डॉबर कुत्रा आणि दूसरा कुत्रा पोहुन पार आले. मग मात्र सुटकेचा श्वास सोडला. आता पुन्हा अंगात वेगळीच ऊर्जा, चेतना जाणवत होती. पाय झपाझप पद्मावत माची कडे पळत होते. बाकी पर्यटक आम्हाला विचारत होते, तुम्ही इकडून मधुनच कसे काय वर आलात? ते आम्हाला पण कळत नव्हतं कसे काय वर आलोत ते...आलोय पण नेमके कसे शब्द फूटत नव्हते आणि भावना ओसंडून वाहात होत्या. पुन्हा जयघोष झाला, जय भवानी!जय शिवाजी!, हर हर महादेव!...ह्या वेळी आमच्या आवाजात बाकी शिवप्रेमी पर्यटकांनी देखील आवाज मिळवला आणि तो आवाज राजगडावरील सुसाट घोंगावनाऱ्या, सुईसुई करनाऱ्या वाऱ्यापेक्षा आणि पावसापेक्षा मोठा होता...तो आवाज होता मराठ्यांचा, मावळ्यांचा...
कारण म्हणतात ना सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात तीनच गोष्टी मुक्तसंचार करु शकतात. वाघ, वारा आणि मावळे.